पाटोदा । वार्ताहर
‘यापुढे तू शेळीचे नाव काढले तर तुला कायमचे संपवून टाकू’ अशी कुरापत काढून एका तरुणास चौघांना बेदम मारहाण केली. तालुक्यातील निवडुंगा येथे शुक्रवारी (दि.10) सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली
नवनाथ जिजाबा सुळे (40,रा.निवडुंगा, ता.पाटोदा) असे जखमीचे नाव आहे. शुक्रवारी तो त्याच्या घरासमोर थांबलेला होता. यावेळी बाबासाहेब गिरीजा सुळे, भगवान बाबासाहेब सुळे, वसंत गहिनीनाथ सुळे, संतोष साहेबराव सुळे (सर्व रा. निवडुंगा) यांनी त्यास ‘यापुढे शाळेचे नाव काढले तर तुला कायमचे संपवून टाकू’ अशी कुरापत काढून शिवीगाळ करत डोक्यात दगड मारून गंभीर इजा पोहोचवली. जखमी नवनाथ सुळे यांच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध शनिवारी अंमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
12
Apr
Leave a comment