बीड: कोरोना महामारीमूळे देशावर संकट ओढवले असता अनेकजण बिकट परिस्थितीत जीवन जगत आहेत, बऱ्याच जणांना दोन वेळच्या जेवणाचीही सोय होत नाही या गोष्टींची जाणीव ठेवत बीड येथे भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक जगदीश भैय्या गुरखुदे व द्वारकाधीश मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष परशुराम भैय्या गुरखुदे यांच्या मार्गदर्शनाखाली द्वारकाधीश मित्र मंडळाच्या वतीने मदतीचा महायज्ञ सुरू केला आहे. नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत सेवा कार्य करणाऱ्या मंडळाच्या वतीने निराधार, गरजू लोकांसाठी गेल्या 9 दिवसापासून दररोज 500 लोकांच्या जेवणाची घरपोहच व्यवस्था करण्यात आली आहे. 500 लोकांचा स्वयंपाक रोज तयार करण्यात येतो व त्यानंतर मित्र मंडळाचे सदस्य पार्सल पॅक तयार करून गरजू लोकांच्या घरपोहच सेवा देत आहेत. तसेच पोलीस बांधवांसाठी 2 वेळा ज्या ठिकाणी त्यांची ड्युटी असेल तेथे चहा देण्यात येतो आहे. या माध्यमातून द्वारकाधीश मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासली जात असून या कामी मंडळाचे सदस्य अथक परिश्रम घेत आहेत.
Leave a comment