आष्टी । वार्ताहर
कोरोना प्रभाव रोखण्यासाठी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे,पण संचारबंदी शिथिलवेळेत नागरिक बेशिस्त होईन,कसल्याच नियमांचे पालन करत नसल्याने आष्टीच्या नायब तहसिलदार तथा नगर पंचायतच्या मुख्याधिकारी कु.शारदा दळवी या महिला अधिका-यांनी जेव्हा दंडूके हातात घेऊन रस्त्यावर उतरल्या तेव्हा सर्वच नागरिक वठणीवर आल्याचे चिञ आष्टीत पाहवयास मिळाले.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने संचारबंदी सकाळी 7 ते 9 एकदिवसाआड शिथील करण्यात आली असून,नागरिक या शिखीलबंदीच्या काळात असे की,आपण जसे की आपण युध्द लढायला आल्यासारखे येऊन कसल्याच नियमाचे आज दि.11 रोजी सकाळ दरम्यान दिसून आले.याची माहिती नगर पंचायतच्या मुख्याधिकारी असलेल्या कु.शारदा दळवी यांना होताच स्वत;महिला अधिकारी येऊन हातात पोलासांचे दंडूके घेत बेशिस्त वागणा-या नागरिकांना चोप देत संपूर्ण भाजी मार्केट पंधरा मिनिटात सुतासारखे सरळ केले.याबाबत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केल्यास आम्हाला कारवाई करण्याची वेळ येणार नाही.परंतु नागरिकही बाजारात आल्यानंतर बेशिस्त वाहने लावून एकाच ठिकाणी जास्त करत सोशल डिस्टनंचे पण पालन करत नाहीत.त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला ईच्छा नसतांना कारवाई करण्यास भाग पाडावे लागत असल्याचे मुख्याधिकारी शारदा दळवी यांनी सांगितले.
Leave a comment