आष्टी । वार्ताहार
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी असतानाही निर्बंधाचे उल्लंघन करणा-या मोकाट रस्त्यावर भटकणा-यांना शनिवारी एसआरपी जवानांनी चांगलाच खाक्या दाखवल्यामुळे दिवसभर सडकफि-यांची चांगलीच पाचावर बसली होती.
आष्टी तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने आता कठोर पावलं उचलली आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून राज्याभर संचारबंदी लागू करण्यात आली. यांस सर्वस्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र सामाजिक जबाबदारीचं भान विसरलेले अनेकजण रस्त्यावर अकारण भटकताना दिसत आहेत. सध्या आष्टीसह कड्यात एसआरपी जवानांनी चौकाचौकात तळ ठोकल्याने दुचाकीवरून भटकणार्यांची पुरती भंबेरी उडाली. संचारबंदी असताना निर्बंधाचे उल्लंघन करून अकारण मोकाट रस्त्यावरच चकरा मारणा-या दुचाकीस्वारांना एसआरपी जवानांनी चांगलाच खाक्या दाखवला. त्यामुळे सडकफिर्यांची चांगलीच पाचावर बसली होती.
-----------
Leave a comment