जिल्ह्याचा समावेश ऑरेंज झोनमध्ये
राज्याची तीन झोन मध्ये विभागणी होणार
बीड /
राज्य सरकारने राज्याची तीन झोनमध्ये विभागणी केली असून रेड ऑरेंज आणि ग्रीन अशा तीन झोनमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येनुसार राज्याची विभागणी केली आहे यामध्ये रेड झोन मध्ये 15 पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे .तर त्याहून कमी असलेल्या जिल्ह्यांचा समावेश ऑरेंज झोन मध्ये केला आहे .तर ज्या जिल्ह्यांमध्ये अद्याप एकही रुग्ण आढळला नाही त्या जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोन मध्ये करण्यात आला आहे
रेड झोन मध्ये राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे ,पालघर ,सांगली ,रायगड आणि औरंगाबाद या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला असून ऑरेंज झोनमध्ये नगर, नाशिक ,सातारा, कोल्हापूर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना ,हिंगोली, लातूर, अमरावती ,अकोला,यवतमाळ ,वाशिम गोंदिया, या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे तर ग्रीन झोन मध्ये धुळे ,नंदुरबार ,सोलापूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा ,आणि परभणी नांदेड चा समावेश करण्यात आला आहे .ज्या जिल्ह्यांचा रेड झोनमध्ये समावेश आहे त्या जिल्ह्यांमध्ये लॉक डाऊन चे सर्व नियम कडक पद्धतीने पाळण्याचे आदेश देण्यात येणार आहेत तर ऑरेंज झोन मध्ये येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा बंदीचा आदेश कायम ठेवून जिल्हांतर्गत टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे याचबरोबर 50 पेक्षा कमी कर्मचारी संख्या असलेल्या सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांना कामकाज सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे ग्रीन झोन मध्ये असलेल्या जिल्ह्यांना देखील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मध्ये सर्व व्यवहार व सवलती मध्ये सूट देण्यात येणार आहे कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यांमध्ये रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या विलगिकरण कक्ष कायम राहणार आहे या जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून कोणीही येऊ शकणार नाही मात्र जिल्हांतर्गत सर्व व्यवहार, दळणवळण सुरू करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. बीड जिल्ह्याचा समावेश ऑरेंज झोनमध्ये करण्यात आल्याने जिल्ह्यामध्ये जिल्हांतर्गत दळणवळणात परवानगी मिळेल तसेच लॉक डाउन मधील काही अटी व शर्ती शिथिल करण्यात येथील त्यामुळे जिल्ह्यातील जनतेला काहीसा दिलासा मिळणार आहे आगामी 14 तारखेपर्यंत सरकार हा निर्णय घेण्याची शक्यता आहे
Leave a comment