बीड । वार्ताहर
राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्य लॉकडाऊन केले आहे. या स्थितीत परिस्थितीत सर्वसामान्य जनतेला धान्य पुरवठा करण्यासाठी रास्त भाव दुकानदारांना धान्य देण्यात आले आहे.मात्र या गंभीर स्थितीत नियमांचे पालन न करणार्या पाच धान्य दुकानांचे परवाने शनिवारी (दि.11) निलंबित करण्यात आले आहेत.
रमेश सीताराम गंगाधर- बीड-41, ज्ञानदेव कान्हू बांड-घोसापुरी, चंद्रकांत रामभाऊ फाटले-बीड-34, चेअरमन फेअर प्राईस शॉप असोसिएशन- बीड-14 व चेअरमन फेअर प्राईस शॉप असोसिएशन- बीड-03 या दुकानांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील काही रास्त भाव दुकानदार दुकान उघडत नाही, धान्य नियमाप्रमाणे न देता कमी प्रमाणात देतात, ई-पोस मशीनची पावती देत नाही, शासनमान्य रकमेपेक्षा जास्त रक्कम घेतात, धान्य देत नाही, ग्राहकांची अडवणूक करतात, ग्राहकांसह अरेरावीची भाषा वापरतात अशा तक्रारी प्राप्त झाले होते. या तक्रारींची गंभीरपणे दखल घेऊन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटील यांनी बीड तालुक्यातील एकूण पाच रास्त भाव दुकानांचे परवाने निलंबित केले असून निलंबित दुकाने नजीकच्या चांगल्या दुकानास जोडण्याबाबत बीडच्या तहसीलदारांना सूचना दिल्या दिल्या आहेत. या कारवाईमुळे लाभार्थ्यांना वेळेवर धान्य न देणार्या व नियमांचे पालन न करणार्या रेशन दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
Leave a comment