मुंबई – राज्यात कोरोनाचे १६५२ रुग्ण आढळले आहेत. त्यातील ९५० च्या दरम्यान मुंबईत रुग्ण आढळले आहेत. लॉकडाऊनसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी १५ दिवस वाढवले आहेत. पण हे सांगताना त्यांनी किमान या शब्दावर जोर दिला आहे. त्यामुळे आपल्याला शिस्त पाळलीच पाहिजे अन्यथा पुढे लॉकडाऊन वाढवण्याची गरज भासल्याशिवाय राहणार नाही असे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.   
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पंतप्रधानांनी सांगितलेल्या सूचनेत एक गाईड लाईन दिली जाणार आहे. ग्रीन, ऑरेंज आणि रेड अशाप्रकारे तीन कॅटेगिरी तयार करण्यात येणार आहे. १५ पेक्षा जास्त रुग्ण आहेत त्याला रेड झोन, १५ पेक्षा कमी रुग्ण असणारे जिल्हे ऑरेज झोनमध्ये असतील तर एकही रुग्ण नाही याठिकाणी ग्रीन झोन लावण्यात येणार आहे. यामध्ये ग्रीन झोनमध्ये जिल्ह्याच्या सीमाबंद करुन त्याअंतर्गत कामकाज सुरु ठेवण्याची परवानगी दिली जाईल. अशाप्रकारे गाईडलाईन एक-दोन दिवसांत केंद्राकडून येतील असं त्यांनी सांगितले.तसेच ग्रीन झोनमधील कंपन्यांमध्येही सोशल डिस्टेंसिंग पालन करणार असतील तर त्या उद्योगांना काम सुरु करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध निर्णय घेण्यात येतील. एपीएमसी कायद्यात बदल करुन जर शेतकऱ्यांना थेट माल बाजारात नेता येईल का हादेखील विचार करण्यात आला आहे. या सर्व मार्गदर्शक सूचना ग्राह्य धरून पुढील कारवाई करतील. मुंबई, पुणे, महापालिका क्षेत्र रेड झोनमध्ये राहतील. ग्रामीण भागात कठोर लॉकडाऊनचं अंमलबजावणी झाली त्याचं कौतुक पंतप्रधानांनी केलं आहे. शहरी भागातही लॉकडाऊन तंतोतंत पाळलं पाहिजे, मी घरी थांबणार, मी कोरोनाला हरवणार याच ब्रीदवाक्याने जनतेने काम करावं असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.