बीड | वार्ताहर
लॉकडाऊनमध्ये चोरटे पुन्हा सक्रीय झाल्याचे दिसत आहे. दारु दुकानानंतर आता चोरट्यांनी किराणा दुकानांकडे मोर्चा वळवला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगावमध्ये चोरट्यांनी किराणा दुकान फोडून १४ हजारांचा माल लंपास केला. शुक्रवारी ही घटना उघडकीस आली.
गोरोबा रामभाऊ नांदवटे यांचे लोखंडी सावरगावमध्ये दुकान आहे. शुक्रवारी पहाटे चोरट्यांनी त्यांचे दुकान फोडून तेलाचे डबे, तेलाच्या बाटल्या, साबण, साखर, तांदुळ, शेंगादाणे असा १४ हजार रुपयाचा माल लंपास केला. या प्रकरणी त्यांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात चाेरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
Leave a comment