सन्मान योजनेचा पहिला हप्ता खात्यात वर्ग केला
नवी दिल्ली । वृत्तसंस्था
देशभरामध्ये कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असून लॉकडाऊनमध्ये सर्व उद्योग-धंदे बंद असल्याने देशाच्या आर्थिक बाजारपेठेला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. जवळपास सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. या परिस्थितीत शेतकर्यांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला असून केंद्र सरकारने जाहिर केलेल्या 1 लाख 70 हजार कोटीच्या आर्थिक पॅकेजमध्ये शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली असून शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकर्यांना मिळणारा प्रतिमहा 2 हजार रूपयाचा हप्ता केंद्र सरकाने शेतकर्यांच्या वर्ग केल्याची माहिती कृषी मंत्रालयाने दिली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 7 कोटी 92 लाख शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये 15 हजार 841 कोटी रूपये सरकारने जमा केले आहे.
कोरोनाच्या या संकटादरम्यान पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत पहिल्या टप्प्यात 7 कोटी 92 लाख शेतकर्यांच्या बँक खात्यात या चालू आर्थिक वर्षात 15 हजार 841 कोटी निधी केंद्र सरकारने जमा केला आहे. कृषी मंत्रालयाने याबाबत निवेदन जारी केले आहे. या योजनेतंर्गत उच्च उत्पन्नातील शेतकर्यांना वगळता सर्व शेतकर्यांना प्रत्येक वर्षी 6 हजार रुपये हे तीन टप्प्यात दिले जातात. 2 हजार रुपयांचे तीन टप्पे वर्षभरात होतात.
कोरोना महामारीचं संकट पाहता चालू आर्थिक वर्षात पहिला टप्पा केंद्र सरकारकडून शेतकर्यांना वितरीत करण्यात आला आहे. कोरोना संकटकाळात 24 मार्चपासून लागलेल्या निर्बंधामध्ये शेतकरी सन्मान निधी योजनेतील 7 कोटी 92 लाख शेतकर्यांना फायदा पोहचवण्यात आला आहे. त्यांच्या खात्यात 15 हजार 841 कोटी जमा करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्रालयाने दिली आहे.
काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने हातावर पोट असलेल्या गरीब कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला होता. गरीब महिलांच्या जनधन खात्यांमध्ये दर महिन्याला 500 रुपये जमा केले जाणार आहेत. जवळपास 20 कोटी महिलांना याचा लाभ मिळेल. महिलांच्या जनधन खात्यांमध्ये 500 रुपये जमा करण्याचे आदेश इंडियन बँक असोसिएशननं (आयबीए) दिले आहेत. 3 ते 9 एप्रिल दरम्यान पैसे बँक खात्यात भरण्याची प्रक्रिया चालेल. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत पुढील तीन महिने महिलांच्या खात्यात प्रत्येकी 500 रुपये जमा होतील. यात कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी महिलांच्या खात्याचा शेवटचा क्रमांक लक्षात घेण्यात येईल आणि त्यानुसार 3 ते 9 एप्रिल दरम्यान पैसे जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल असा विश्वास दिला आहे.
Leave a comment