नेकनुर/वार्ताहर
नेकनूर येथील मूळ रहिवासी असणारे आणि सध्या आष्टी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असणारे अश्रूबा तुकाराम शिंदे यांचे वडील वै. तुकाराम करभारी शिंदे यांचे तीन दिवसांपूर्वी निधन झाले होते. निधन झाल्यावर दहाव्या दिवशी निधन झालेल्या व्यक्तीची राख नदी पत्रात टाकण्याची जुनी प्रथा आहे परंतु नेकनूर मधील शिंदे कुटूंबियांनी या प्रथे ला फाटा देत दहाव्या दिवशी दहावा न करता तीन दिवसांतच दहावा उरकवत त्यांची राख नदीमध्ये न विसर्जित करता शेता मध्ये वृक्षारोपण केले आणि ती राख वृक्षाला टाकली.
Leave a comment