माजलगाव: उमेशकुमार जेथलिया
कोविड 19 च्या प्रादुर्भावमुळे सम्पूर्ण जग लॉकडाऊन झालेले असताना कोरोना चा संसर्ग होऊ नये म्हणून अनेक डॉकटर नी हॉस्पिटल तसेच क्लिनिक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असताना आपला जीव धोक्यात घालून डॉ प्रकाश आंनदगावकर यांनी 1 रु ही न घेता पूर्णपणे मोफत उपचार सुरू केले आहे.लॉक डाऊन मध्ये ही मोफत उपचार करणारा अवलिया असेच सर्व सामान्य रुग्ण त्यांच्या विषयी भावना व्यक्त करत आहे.
माजलगाव शहरातील अनेक हॉस्पिटलची एक वेळची तपासणी फिस 150 ते 200 रु असताना आणि ही फिस वसुली साठी एरवी वेगळा हातखंडा वापरणारे डॉक्टर असताना ही डॉ प्रकाश आंनंदगावकर हे जो दे उसका भी भला जो ना दे उसका भी भला या तत्वा नुसार देणारकडून ही केवळ 50 रु फिस एरवी घेतात.कोणी नाही म्हणले तर उदार भावनेने सोडून ही देतात आणि त्यांचा हातगुण येतोच असे मनोमन वाटणारे तालुक्यात 50 टक्के रुग्ण आहेत हे विशेष.
सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे शहरातील निम्मे दवाखाने बंद आहेत. अनेक हॉस्पिटल ही केवळ संचार बंदीत सूट असतानाच उघडतात असे असताना सकाळी 7 ते शेवटचा रुग्ण असे पर्यंत डॉ प्रकाश आनंदगावकर हे दवाखान्यात थांबतात.सकाळी 12-1 वाजेपर्यत 100 ते 200 रुग्ण त्यांच्या हातखालून सध्या जात आहेत.लॉक डाऊन मुळे सर्वच छोटे-मोठे व्यवसाय बंद शिवाय अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.या ची जाणीव ठेवून डॉ प्रकाश आनंद गावकर यांनी लॉक डाऊन च्या पूर्ण काळात मोफत रुग्ण सेवा करण्याचा वसा घेतला आहे.
Comments (2)
Hearty congratulations Dr Anandgaonkarsaheb
Devduth
The Great Anandgavkar saheb
Leave a comment