माजलगाव:उमेशकुमार जेथलिया
माजलगावच्या व्यापाऱ्यांनी सगळी नाकाला गुंडाळली असून होलसेल च्या यादीत नाव देऊन किरकोळ विक्रेत्याच्या वेळेत च दुकान उघडून बसले आणि होलसेल च्या वेळेत ही चालूच ठेवले.जनांची नाही तर नाही स्वतः च्या तनाची (शरीराची) तरी काळजी घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करायला हवे.
जिल्हाधिकारी जे निर्णय घेत आहेत त्यात ग्राहक आणी व्यापारी दोघांचे हित असून कोरोनाला रोखण्यात बीड जिल्ह्यास जे यश मिळाले आहे त्यात जिल्हाधिकारी रेखावार यांच्या निर्णयाचा मोठा वाटा आहे.परंतु व्यापाऱ्यां सारख्या समजदार जमातीने आपत्कालीन परिस्थितीत तरी पळवाटा काढणे योग्य नाही मात्र अनेक व्यापाऱ्यांनी होलसेल च्या यादीत नाव टाकून दुपारी ही दुकान उघडे रहावे याची सोय केली आणि सकाळी च्या वेळेत ही दुकान उघडे ठेवून दुकानदारी केली.पण या सर्व प्रकारात कोरोनाला रोखण्यासाठी उचलली जात असलेल्या उपायांना छेद देणारे ठरत असून व्यापाऱ्यांनी जनतेची नाहीतर नाही स्वतः च्या आरोग्यासाठी तरी नियमानुसार काम करायला हवे
चौकट
दूध एजन्सीला वेळ वाढवून हवा
शहरात असणाऱ्या दूध एजन्सी मार्फत दूध ग्रामीण भागातील दुकानावर विक्री साठी दिले जाते मात्र होलसेल व्यापाऱ्यां च्या यादीत नाव नसल्यामुळे दूध एजन्सी असणारा व्यापाऱ्यां दुपारी दुकान उघडता येत नाही यात दूध खराब होण्याचे ही प्रकार घडत आहेत.
Leave a comment