बीड ( डॉ. सतिष लड्डा )

कोविड 19 च्या उद्रेकानंतर, जगभरातील संपूर्ण मानवजातीला त्रास होत आहे व आज घडीला यावर कोणतेही प्रभावी औषधींचा शोध लागलेला नाही.

शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढविणे हाच कोरोना संसर्ग रोखण्यासाठीचा उत्तम पर्याय अपणा सर्वांसमोर आहे.

या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाने आयुर्वेद प्रतिबंधक उपाय व होमिओपॅथिक औषधी सुचवले आहेत.

पूर्ण दिवसभर जास्तीत जास्त कोमट पाण्याचे सेवन करणे, दररोज कमीतकमी तीन मिनिटांसाठी योगा, प्राणायाम व मेडिटेशन करणे, जेवनामध्ये हळदी धने व जिरा यांचा नियमित वापर करणे, दररोज सकाळी दहा ग्राम च्यवनप्राश प्रशान करणे, तुळस , दलचिनीपासून बनविलेले हर्बल चहा पिणे हे सर्वांना सहज करता येणारे काही आयुर्वेदिक उपाय नियमित सुरू ठेवून आपण आपली प्रतिकार शक्ती मजबूत ठेवाण्यास मदत करु शकतो.

त्याच बरोबर केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयामार्फत आपल्या कर्तव्यात दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हयातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या साठी कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाय म्हणून homoeopathie pathic औषध पुरवण्यात आल्या आहेत.
बीड जिल्हा पोलिसांसाठी पण
कोरोना विषाणू प्रतिबंधक होमिओपॅथिक औषधी प्राप्त झाल्या आहेत.

जिल्ह्यातील कर्मचारी व अधिकारी यांच्या संख्येनुसार प्रत्येक पोलीस स्टेशनला सदरील औषधी चे वितरण करण्यात येणार असून, प्रत्येक पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी त्यांचे कौटुंबीक डॉक्टर यांच्या सल्ल्या घेऊन सदरील homoeopathic औषधींचा वापर करावा असे बीड जिल्हा पोलीस अधीक्षक बीड यांनी सर्व पोलीस स्टेशन यांना सूचित केले आहे.

या औषधीच्या बाटलीस अगोदर दहा वेळा हलवून त्यातील तीन गोळया जेवणाच्या अर्धातास अगोदर किंवा नंतर दिवसातुन तीन वेळेस घ्याव्यात, तसेच शक्य असेल तर दररोज दुपारी बारा ते चार या दरम्यान अंगावर उन्ह घ्यावेत यावे असे आदेशात सूचित करण्यात आले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.