*राहुल जगताप,नगरसेवक शरद यादव यांचा उपक्रम
माजलगाव दि.१०( प्रतिनिधी ):- कोरोना साथीने जगात थैमान घातले असुन या साथीला रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार मोठे प्रयत्न करीत आहे.घरात राहा सुरक्षित राहा असे आदेश असल्याने गोर गरीब लोक खुप अर्थिक अडचणीत येत असल्याने छञपती सहकारी साखर कारखान्याचे व्हॉइस चेअरमन तथा भाजपा नेते मोहनराव जगताप यांच्या वाढदिवसा निमित्त जीवन आवश्यक वस्तू चे वाटप करून राहुल जगताप, नगरसेवक शरद यादव यांनी आधार देण्याचा उपक्रम राबवला आहे .
कोरोना साथीने संपूर्ण जगात थैमान घातले आहे या जीव घेण्या साथीला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी,राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मंत्री हे खुप मोठे प्रयत्न करीत आहेत या साथीवर विजय मिळवायचा असेल तर शासनाने जनतेने सुरक्षित राहण्यासाठी आप आपल्याला घरात च राहाण्याचे आव्हान केले आहे या मुळे शासनाची मदत तर होतच आहे परंतु समाजाचे ही आपण काही लागतो म्हणून या भयान परिस्थितीत छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन, तथा भाजपाचे नेते मोहनराव जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त इतर कुठलाच खर्च न करता शहरात,मालीपारगा़व,माळेवाडी,शाहापुरमंजरा,खेर्डा,जायकोचीवाडी,तेलगांव,ईरला,देपेगांवआदी गांवातील गोर गरीब गरजुवंताना साखर,चहापत्ती,तेल,तुरदाळ,तांदूळ, आदि जीवन अवश्य वस्तुचे वाटप सोनाजीराव शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राहुल जगताप, नगरसेवक शरद यादव यांनी करून मदतीचा आधार देण्याचा उपक्रम राबविले आहे.
या वेळी राजेंद्र वापटे,हिंतेद्र काळे,सय्यद जमील,बंटी जगताप, प्रदिप दळवी ,अशिष ठोंगे,अँड.जयराम सजगणे, डॉ. कैलास काठवडे,दादासाहेब ढगे, शिवाजीराव सोजे,लोभाजी भोरजे,प्रकाश आळणे,श्रीराम रिंगणे,अर्जुन धनवडे,दत्ता आळणे,महादेव गायकवाड, श्रीमंत धिरडे,युवराज जगताप, आदी नी परिश्रम घेतले.
Leave a comment