किल्ले धारूर (प्रतिनिधी) धारूर तालुका शालेय पोषण आहार संघटनेने माणुसकी जपली आहे देशात लॉक डाऊन आहे कोरोना या विषाणू मुळे संपूर्ण देश भीतीदायक अवस्थेत आहे या विषाणू वर मात करण्यासाठी सर्व पोलीस, डॉक्टर, पत्रकार दिवस रात्र काम करत आहेत या सर्वांचे कष्ट पाहून धारूर तालुका शालेय पोषण आहार संघटनेचे तालुका अध्यक्ष डॉ अशोक थोरात व त्यांच्या सहकारी यांनी सर्वांसाठी जागेवर भोजन देण्याची व्यवस्था केली यातून त्यांनी माणुसकी जपल्याचे दिसून आले
सर्व कर्मचारी यांनी शोसल डीटन्स ठेवून जेवण घेतले यावेळी पोलीस निरीक्षक सुरेखा धस, उपनिरीक्षक गोविंद बास्टे, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश काळे , पत्रकार सूर्यकांत जगताप, नाथा ढगे , सतीश पोतदार, शेख इरफान इत्यादी उपस्थित होती शालेय पोषण आहार संघटनेच्या कार्यकर्त्या मीरा शिंदे, लता खेपकर, सुमित्रा डोईफोडे, वैशाली अडसूळ, संगिता थोरात, कौशल्य शिंदे, इंदुबाई खेपकर, शुभम डोईफोडे, शुभम थोरात, ओंकार थोरात, अप्पा थोरात शरद शिंदे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले
Leave a comment