बीड | एकीकडे कोरोना सोबत दोन हात करताना शासन प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. कोरोनामुळे उद्योगधंदे बंद झाले, सर्वसामान्यांवर उपासमारीचं संकट आलं, असातच सरकारने तीन महिन्याचे रेशन दिल्या जाईल असा धीर नागरिकांना दिला. मात्र आजही ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत रेशन मिळत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. केज तालुक्यातील विडागाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बेंगळवाडी आणि गौरवाडी या दोनशे कुटुंब असलेल्या दोन वाड्यामध्ये गेल्या तीन वर्षापासून रेशन मिळत नाहीये. हा धक्कादायक खुलासा गावकऱ्यांनी केलेला आहे, रेशन कार्ड तयार करण्यासाठी दुकानदाराने पाचशे रुपये घेतल्याचा आरोप सुद्धा या गावकऱ्यांनी केला आहे एवढेच नाही तर अंगठे घेतले जातात मात्र रेशन दिले जात नाही. दुर्दैव म्हणजे हातावरचे पोट असलेल्या या गावातील तब्बल अर्ध्यापेक्षा जास्त लोकांचे अन्नधान्य संपले आहे. त्यामुळे आता सरकारने आमचा रेशन बद्दलचा प्रश्न सोडवावा अशी मागणी गावकऱ्यांकडून केले जात आहे
हातावर पोट असलेल्या मजूर, शेतकऱ्यांना रेशन मिळत नसल्यामुळे आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच राज्यात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता लॉक डाऊन वाढवण्याची शक्यता वर्तवली जात असताना दुसरीकडे या गोरगरीब कुटुंबातील नागरिकांनी आता काय खावे असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होत आहे. सरकार मात्र मोफत धान्य देण्याच्या बाबतीत विचार करत आहे मात्र केज तालुक्यातील या दोन गावात मात्र गेल्या तीन वर्षापासून तर धान्य मिळाले नसेल तर रेशनचा काळाबाजार करतय तरी कोण हा बघून प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली जाते याबाबत तहसिलदारांसोबत संपर्क केला असता त्यांनी आमच्याकडून बेंगळवाडी, गौरवाडी या गावांना प्रत्येक महिन्याला राशन दिले जात असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. नागरिकांच्या तक्रारी बाबत मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, यांना सूचना दिलेल्या आहेत यामध्ये जर दुकानदार रेशन वाटप करीत नसेल तर त्यांच्यावर कार्यवाही केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Leave a comment