स्वाभिमानचे प्रा. सचिन उबाळे यांचा उपक्रम
बीड । वार्ताहर
माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमान संघटना बीड जिल्ह्याच्या वतीने बीड शहरातील गोरगरीब 100 कुटुंबाला अन्नधान्य वाटप करण्यात आले.
सध्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला ग्रासले असून जनतेमध्ये भितीयुक्त वातावरण निर्माण झाले असून या मध्ये गोरगरीब जनते पुढे अनेक समस्या असल्याने, वाढदिवसाचा खर्च टाळून स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार नितेश राणे,पंकजाताई मुंडे, खा,प्रीतमताई मुंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमान संघटना जिल्हाध्यक्ष प्रा.सचिन उबाळे यांच्या पुढाकाराने खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त गरिब व हातावर पोट असणार्या बीड शहरातील 100 कुटुंबांना अन्न धान्य व भाजीपाल्याचे वाटप करण्यात आले. यावेळी स्वाभिमानचे भोला जाधव, बाळासाहेब कदम, गणेश माने, नितीन डिसले, विकास वायभट, बाबू उबाळे, सागर टेकाडे,विशाल गायकवाड, मयुर त्रिभुन,रोहित गायकवाड, अजय त्रिभुन,सुहास विद्यागर आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
-----
Leave a comment