राज्यातील सरपंचा पासून ते आमदार,खासदार पर्यंतच्या जनसेवकांनी पक्षविरहीत,प्रशासनाच्या अधीन राहून कोरोना बाबतीत स्वतंत्र यंत्रणा उभी करावी...!
......................................................
देशात व राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसें-दिवस वाढत चालला आहे.परस्थिती कांही प्रमाणात का होईना धोक्याचे संकेत देताना दिसत आहे.राज्याचे शीर्ष नेतृत्व आवश्यक ते सर्व पाऊल उचलताना दिसत आहे.कारण गत कांही दिवसात ज्या प्रमाणे कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला आहे,ती आकडेवारी पाहून भविष्यातील संकटाची तिव्रता लक्षात येत आहे.राज्य सरकारने सध्या उपलब्ध त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांची संख्या,कमी पडणारे कर्मचारी आणि भविष्यात या कोरोना विषाणूमूळे परस्थिती बिघडलीच तर भविष्यात लागणारा कर्मचारी वर्ग,या सर्व बाबींचा विचार करून राज्य सरकारने व जिल्हा प्रशासनाने खाजगी हॉस्पिटल,मेडिकल कॉलेज व त्यांचा स्टाफ,शिक्षक,आशा वर्कर व ईतर विभागातील कर्मचाऱ्यांना टप्याटप्याने प्रशिक्षण देण्यास सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत....!
अशा संकट समयी सर्व जबाबदारी सरकार वर सोपवण्या पेक्षा,राज्यातील सर्व नागरिकांची,जनतेने निवडून दिलेल्या सर्व जनप्रतिनिधींची जबाबदारी काय असायला हवी,काय ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे.जेणेकरून शासकीय यंत्रणेवरील ताण आपण कांही प्रमाणात का होईना कमी करू शकतो.या सर्व बाबींचा विचार होणे गरजेचा आहे.चालू परस्थितीत असे निदर्शनास येताना दिसत आहे की,कुठलाही जनप्रतिनिधी 'अपवाद वगळता' स्वतःच्या कार्यक्षेत्रात खबरदारी म्हणून सुरक्षितपणे वावरताना दिसत नाही.मग त्या सर्व जनप्रतिनिधींना जनतेचा एक प्रश्न आहे,की निवडणूक काळात आपण ज्या पद्धतीने रात्रंदिवस फिरताना दिसतात,त्याच मायबाप जनतेच्या जीवावर पाच पाच वर्षे राज्य करता तिचं जनता आज संकटात आहे.तुम्ही आज मदत करणार नसाल तर मग कधी,हीच माय बाप जनतेची सेवा करण्याची संधी आहे आणि ती जाऊ देऊ नका.भिती तर सर्वांनाच वाटते मग जनता असो,आरोग्य खात्याचे कर्मचारी असो,पोलीस प्रशासन असो की कोरोना मोहिमेशी जोडलेला प्रत्येक कर्मचारी असो.पण सर्वजण कर्तव्य पार पडतातच ना,मग सर्वांनी मिळून पक्ष विरहित प्रशासनाच्या आधीन राहून एक स्वतंत्र यंत्रणा उभा केली पाहिजे.कारण प्रत्येकाचा आपापल्या मतदारसंघात असलेला तगडा अनुभव राज्याच्या आणि देशाच्या कामाला येणार आहे.शासकीय यंत्रणा जेवढ्या लवकर शेवटच्या नागरिकांपर्यंत जाणार,त्याच्यापेक्षा किती तरी लवकर तुम्हा जनसेवकांची यंत्रणा शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहचणार आहे,कारण निवडणुकीतील आल्याला अनुभव आज कामाला येणार आहे.....!
करायचे कांहीच नाही,सरपंचाने पाच दहा सुसक्षीत तरुण घेऊन त्यांना छोट्याखाणी कोरोनविषयी माहिती देऊन सुरक्षित कसं काम करावं ही माहिती देणे,आणि त्यांच्या मदतीने पूर्ण गाव सांभाळून कांहिही कमी जास्त पडलेली सामग्री जवळील शहरातून शिथिल वेळेत आणून वाटप करणे.पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषद सदस्य,आमदार आणि खासदार यांनी फक्त या मोहिमेवर नियंत्रण ठेवून त्यांना आर्थिक रसद पुरवीणे आणि मार्गदर्शन करने.याने होणार काय तर,अशा संकट वेळी प्रशासनास झालेली ही मदत कल्पना करा किती सर्वोच्च मदत ठरू शकते.हे सर्व सहज शक्य आहे कारण स्वतःच्या गावात सरपंच काय करू शकत नाहीत.....!
आता राहतो प्रश्न आर्थिक रसदीचा संबधीत पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सूचनेनुसार जर ही संकल्पना राबवली तर मला नाही वाटत पैसा कमी पडेल.जर समजा कमी पडलाच तर जवळील कांही पैसा खर्च करा भविष्यात मतदारसंघात एक चक्करही मारण्याची आवश्यकता पडणार नाही.कारण नागरिकांना कल्पना आहे,की कोरोना ही वैश्विक महामारी किती भयानक आहे.जागतिक महासत्ता असणारे देश सुद्धा गुडघ्यावर आले,तर आपले काय.....!
त्यामुळे सर्व प्रतिनिधींना कळकळीची विनंती आहे,या गोष्टीवर पक्षविरहीत विचार व्हावा व आपले गाव,आपला तालुका व आपला जिल्हा कसा सुरक्षित राहील याचा विचार करावा...सर्व जनतेलाही आग्रहाची विनंती आहे.या कोरोनाला हरविणे सहज शक्य आहे.फक्त घराबाहेर येऊ नका,हात वेळोवेळी साबणाने स्वच्छ धुवा,जे बाहेर कर्तव्यासाठी जातात त्यांनीही सुरक्षित काळजी घेवुनच कर्तव्य पार पाडावे,तो दिवस नक्की लवकरच उजडेल त्या दिवशी आपण कोरोना अगदी हद्दपार केलेला असेल...! जय हिंद.....!
मुक्त'पत्रकार - संतोष ढाकणे
9756757575
Leave a comment