नेकनुर/ मनोज गव्हाणे
परिस्थिती गरीब असली तरी मन श्रीमंत असायला हवे याचाच प्रत्यय आज नेकनुरकराना आला . स्वतःजवळ असणार्या शेळ्या,बोकडांची विक्री करून अगदी ज्यांना खरंच मदतीची नितांत गरज आहे अशा कुटुंबापर्यंत कुठलाही गाजावाजा न करता पोहचला एक गरीब पण मनाने श्रीमंत दशरथ कोळपकर हा युवक
लॉकडाउन, संचारबंदी या परिस्थितीने अनेकांना रोजगार नसल्याने उपासमारीची स्थिती निर्माण झाली. वृद्ध, निराधार, अशा कितीतरी जणांना दोन वेळेच्या जेवणाचीही अडचन उभी राहिली आहे. नेकनुरमध्ये अनेक श्रीमंत लोकांची यादी निघेल यामध्ये व्यापारी, राजकारणी अग्रस्थानी असले तरी दयित्वा च्या यादीत मात्र दशरथ बाबुराव कोळपकर या अत्यंत साध्या कुटुंबातील युवकाचे स्थान पुढे असेल आठवडी बाजारा दिवशी खानावळ चालवत कुटुंबाला आधार देणारा स्वतः या परिस्थितीने अडचणीत असताना शुक्रवारी अनेक गरीब कुटुंबाच्या दारात सामान घेऊन पोहचला. आपल्यापेक्षाही अनेकांना हे संकट मोठे असल्याचे ओळखून दशरथ याने शेळ्या, बोकडांची विक्री करत यातून उभा राहिलेला पैशाने गरिबांची चूल पेटवून श्रीमंतांच्या डोळ्यात खऱ्या अर्थाने अंजनच घातले म्हणावे लागेल कारण मदतीसाठी अजून कोणी नेकनुर मध्ये पुढे आले नाही. अशावेळी आपल्या परिस्थितीचा विचार न करता दशरथ सारखा युवक मनाचा मोठेपणा दाखवत वीस-पंचवीस गरिब कुटुंबाचाआधार बनतो हे नक्कीच कौतुकास्पद आहे.
Leave a comment