गेवराई । वार्ताहर
कोरोना रोगाच्या संकटात देश हादरून गेला असून सामाजाचे आपण काही तरी देणे लागतो या उदात्त हेतूने सामाजिक कार्यकर्ते एस.वाय अन्सारी यांच्या कडून गरजुंना होणार 8 हजार आर्सेनिक अल्बम या गोळ्याचे वाटप करणार असुन समाजातील महत्त्वाचा घटक असनार्या पत्रकारांपासून बुधवार दि.10 रोजी सकाळी 11 वाजता अन्सारी यांनी वाटपास सुरूवात केली.
सामाजिक कार्यकर्ते एस.वाय अन्सारी यांची मुलगी डॉ. अस्मा अन्सारी या बी.एच्.एम.एस या मेडीकलची पदवी प्राप्त असून त्यांनी गरजु लोकांसाठी कोरोना या महामारीवर प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी आर्सेनिक अल्बम गोळ्या तयार केल्या असून, त्यांनी या गोळ्यांची माहिती देताना असे सांगितले की, या गोळ्या कोरोना आजार बरा करण्यासाठी नसून या आजारावर प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण करतात. आर्सेनिक अल्बम गोळ्या ह्या बाजारात खुप जास्त किंमतीने विकल्या जातात त्या सर्व सामान्य नागरिकांना घेण्यास परवडत नाही. यासाठी गरजुंना या गोळ्या मोफत मिळाव्यात यासाठी या गोळ्या तयार केल्या असून आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे 8 हजार पॅकेट तयार केले आहेत्. या 8 हजार पॅकेटचे गरजुंना वाटप करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्या म्हणाल्या की, ज्या ठिकाणी आजारी व्यक्तींना चेकप करण्याची गरज आहे अशा ठिकाणी मोफत सेवा देण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.नजमा अन्सारी यांच्या हस्ते गेवराई समाजातिल महत्त्वाचा घटक म्हणून पत्रकारांकडे पाहिले जाते. यासाठी त्यांनी पत्रकारांपासून या आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटपास सुरूवात केली असून गुरुवार दि.10 रोजी एस.वाय अन्सारी यांच्या स्वर्गही पत्रकारांना आर्सेनिक अल्बम गोळ्याचे वाटप करण्यात आले. यावेळी गेवराई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर,उपाध्यक्ष संतोष भोसले,अयुब बागवान, सुभाष सुतार, गणेश क्षिरसागर, जुनेद बागवान,भागवत जाधव, प्रसाद कुलकर्णी, ढाकणे मामा आदी सह अनेक जण उपस्थित होते.
Leave a comment