बीड । वार्ताहर

विराज जगतापची ऑनर किलिंग, अरविंद बनसोडे यांची हत्या व एकाच आदिवासी कुटुंबातील तिघांची हत्या या प्रकरणांची कायदेशीर चौकशी करून ते विशेष न्यायालयात चालवा या मागणीसाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) महाराष्ट्र राज्य कमिटीने आज 12 जून रोजी राज्यभर आंदोलन करून वाढत्या जातीय अत्याचाराचा तीव्र निषेध केला. याला बीड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. जातीय अत्याचारा सारख्या घटनांच्या निषेधार्थ आणि दोषींवर कडक कारवाई करा. या मागणीसाठी एसएफआयने हे आंदोलन बीड जिल्ह्यासह राज्यभर केले. तथा वडवणी येथे तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्य कमिटीने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवले आहे. 

जिल्ह्यातील व राज्याच्या वेगवेगळ्या भागात एसएफआयच्या कार्यकर्त्यांसह विद्यार्थ्यांनी आपल्या घरातूनच यात सहभाग घेऊन निषेध नोंदवला. काही आठवड्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात मांगवडगाव येथे एकाच आदिवासी कुटुंबातील तिघा जणांना ठार मारण्यात आले. काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यात नारखेड येथे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते अरविंद बनसोडे यांना जीवे मारले गेले. आणि आता चार दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात पिंपरी येथे विराज जगतापची ऑनर किलिंग झाली. या घटनांचा एसएफआय तीव्र धिक्कार करते आणि अशा अत्याचाराच्या विरोधात राज्यातील विद्यार्थी व जनतेने एकत्र येऊन लढण्याचे आवाहन करत आजचे हे निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव, माजी राज्य अध्यक्ष व डीवायएफआयचे राज्य सहसचिव मोहन जाधव, जिल्हा अध्यक्ष सुहास झोडगे, जिल्हा सचिव लहू खारगे, सत्यजित मस्के, संतोष जाधव, संतोष राठोड, शिवाजी जाधव, जिल्हा कमिटी सदस्य ऋषिकेश कलेढोंन, शरद कुरकुटे, प्रतीक बागडे, प्रसाद भुजबळ आदींसह विद्यार्थी सहभागी झाले होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.