मुंबई: करोना संकटामुळं महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आता राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेचं सदस्यत्व देण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. तसंच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनाही विनंती केली आहे.
महाराष्ट्रावरील करोना विषाणूचं संकट अधिक गहिरं होत गेल्यानं विधानपरिषदेच्या निवडणुका पुढं ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळं उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद धोक्यात आलं होतं. मात्र, आता मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरील संकट जवळजवळ टळलं आहे.
राज्यघटनेतील कलम १६४ (४) अन्वये, मुख्यमंत्रिपदावर कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्यास, त्यांना सहा महिन्यांच्या आत कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणं अनिवार्य असतं. उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. हे पद कायम राखण्यासाठी २८ मे अगोदर त्यांना विधीमंडळाच्या सभागृहाचं सदस्य होणं आवश्यक आहे.
Leave a comment