बीड | वार्ताहर
मागील दोन दिवसात जिल्ह्यातून तपासणीसाठी पाठवलेल्या 156 पैकी तब्बल 150 व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह व 6 पॉझिटिव्ह आल्यानंतर आज शुक्रवारी सकाळी जिल्ह्यातून 43 जणांचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने ही माहिती देण्यात आली.
जिल्हा सामान्य रुग्णालयातून 2, बीड कोव्हीड केअर सेंटर 9, स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई 8, केज उपजिल्हा रुग्णालय 9, माजलगाव ग्रामीण रुग्णालय 5, गेवराई उपजिल्हा रुग्णालय 9 आणि परळी उपजिल्हा रुग्णालयातून एका व्यक्तीचा स्वॅब तपासणीला पाठवण्यात आला आहे.
Leave a comment