बीड । वार्ताहर
बालाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व बीड मधील जुने व्यापारी हिरालालजी सारडा यांचे आजाराने दिनांक 31 मे रोजी रात्री 8ः30 वाजता त्यांच्या काळा हनुमान ठाना येथील निवासस्थानी वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले.
माजी नगर सेवक, मंत्री बँकचे माजी अध्यक्ष, हिरालाल चौक व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, राजस्थानी सेवा समाजाचे अध्यक्ष, तसेच जुन्या पिढीतील राजकारणी, समाजकारणी अशी त्यांची ओळख होती. अनेक सामाजिक कामात त्यांचा मोलाचा वाटा होता. मितभाषी स्वभाव ही त्यांची खरी ओळख. त्यांच्या पश्चात 2 मुले राजेंद्र सारडा व महेंद्र सारडा व 3 मुली जयश्री तोतला, ज्योती बजाज व स्वर्गवासी ज्योत्सना लोहिया व नातवंडे असा मोठा परिवार आहे. सुभाषचंद्र सारडा व अमृतकाका सारडा यांचे ते ज्येष्ट बंधू होत. त्यांचा अंत्यविधी आज दिनांक 1 जून 2020 सोमवारी सकाळी 10 वाजता अमरधाम स्मशानभूमी येथे होणार आहे. सारडा परिवाराच्या दु:खात लोकप्रश्न परिवार सहभागी आहे.
Leave a comment