औरंगाबाद - मराठवाड्यात करोणा विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दररोज वाढत असून, तूर्तास बहुतांश रुग्णांची स्थिती फारशी गंभीर नाही. मात्र, क्रिटिकल रुग्णाला व्हेंटिलेटरची आवश्यकता असते. येणाऱ्या काळातील वाढता धोका लक्षात घेता विभागात ४३७ व्हेंटिलेटरची गरज आहे, पण सध्या फक्त १५३ उपलब्ध आहेत.

करोना संशयित आणि पॉझिटिव्ह रुग्णाचे निदान, उपचारामध्ये महत्त्वाच्या ठरत असलेल्य 'पीईपी' कीट, एन ९५ तसेच ट्रीपल लेअर मास्कची मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर करमतरता असल्याचे समोर आल्यानंतर आता विभागातील रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरचीही कमतरता असल्याचे उघडकीस आले आहे. प्रत्येक जिल्ह्यांकडून व्हेंटिलेटरची मागणी करण्यात आली असून, याची ऑर्डरही देण्यात आली आहे.

मात्र, अद्याप देण्यात आलेल्या ऑर्डरपैकी पाच एप्रिलपर्यंत तरी एकही ऑर्डर प्राप्त झाली नसल्याचे विभागीय प्रशासनाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात करोना विषाणूने हातापाय पसरण्यास सुरुवात केली आहे. सर्वसामान्य नागरिकांनाच नाही तर डॉक्टर, नर्स तसेच रुग्णालयातील ब्रदर्सलाही करोणाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने लॉकडाऊन केले असले तरीही करोणाची लागण होत असल्याचे चित्र आहे. एकीकडे प्रशासकीय पातळीवर लागण होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येत असताना दुसरीकडे आरोग्य विभागही करोनाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाला आहे. कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. त्यांना केवळ वैद्यकीय उपकरणे तसेच सुरक्षा साहित्यांची गरज आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.