आष्टी । वार्ताहर

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील सावरगाव (मायंबा) येथील रहिवासी विकास देवराव म्हस्के यांनी मुख्यमंत्री सहायता निधी -कोविड 19साठी 55 हजार 555 रुपयांची मदत निधी दिली आहे. म्हस्के हे नगर येथे अभ्युदय सहकारी बँकेत अधिकारी असून, नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडे त्यांनी मदत निधीचा धनादेश सुपूर्द केला.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विकास म्हस्के यांनी आपल्या परीने मदत देण्याच्या ठरविले. त्यानुसार सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी-कोविड 19साठी 55 हजार 555 रुपयांचा धनादेश आ.जगताप यांच्याकडे नुकताच सुपूर्द केला. यावेळी ज्ञानेश्‍वर बांदल, विजय चंदनशिव, गणेश म्हस्के, नितीन आहेर आदी उपस्थित होते. दरम्यान विकास म्हस्के हे अभ्युदय बँकेत नगर येथे अधिकारी असून, भविष्य निर्वाह निधीची रक्कम काढून त्यांनी ही मदत केली आहे. यापूर्वीही त्यांनी 2011मध्ये मच्छिंद्रनाथ गडाच्या विकासासाठी 55 हजार 555 रुपयांचे योगदान दिले होते. तसेच मागील वर्षी दुष्काळग्रस्तांसाठी 55 हजार 555 रुपये आमदार सुरेश धस यांच्याकडे धनादेश देऊन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केले होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.