माजलगाव:
रस्त्यावर मोटसायकल आनण्यास बंदी असताना ही संचारबंदीत मुख्य रस्त्यावर येणाऱ्या शेकडो टवाळखोराच्या मोटरसायकल आज शहर पोलिसांनी जप्त केल्या.शहर पोलीस ठाण्या समोरच्या मुख्य रस्त्यावर सकाळी 10 ते 11 वा च्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली.माजलगाव शहरातील टवाळखोरना अजूनही कोरोनाच्या भयानक तेची जाणीव झाली नसल्याचे स्पष्ट झाले
माजलगाव शहरात संचार बंदी शिथिलते चा गैरफायदा घेत शिथिलतेचा वेळ संपल्यावर ही अनेक जण खोटे बहाणे करून सकाळी 10 ते 11 च्या वेळात मुख्यरस्त्यावर टवाळखोर पणा करताना आढळून आल्यानंतर व मुख्य रस्त्यावर मोटरसायकल वापरण्यास बंदी असताना ही मोटरसायकल घेऊन येणारावर आज शहर पोलिसांनी पोलीस निरीक्षक सुरेश बुधवन्त यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय अविनाश राठोड,कॉन्स्टेबल सानप,राठोड,पवार यांनी कारवाई केली.
Leave a comment