खुनाच्या घटनेने परिसरात खळबळ

माजलगाव/दिंद्रुड - वार्ताहर

माजलगाव तालुक्यातील पिंपळगाव (ना) येथे शनिवारी रात्री दारु पिऊन झालेल्या वादात भावाने लहान भावाचा डोक्यात वार करुन खून केला. रविवारी सकाळी हा प्रकार उजेडात आला. 

पोलीस सूत्रांच्या प्राथमिक माहितीनुसार, लक्ष्मण दशरथ काळे (२९) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याला दारुचे व्यसन होते. शनिवारी रात्री दारुच्या नशेत लक्ष्मण व त्याचा मोठा भाऊ गजानन यांच्यात वाद झाला. याच वादात गजानन याने लक्ष्मणच्या डोक्यात कशाने तरी वार केल्याने त्याचा मृत्यू झाला.सकाळी घटनेची माहिती मिळताच दिंद्रूड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अनिल गव्हाणकर हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आहे.मृत युवकाच्या आईनेच पोलिसांना याबाबत खबर दिल्याने पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.