डोंगरकीन्ही । वार्ताहर
कारेगाव (ता.पाटोदा) येथे कोरोनाचे रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून कारेगाव, डोंगरकिन्ही परिसर सील केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर अंमळनेर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी ठिकठिकाणी चेकपोस्ट उभे केले आहेत.
चेक पोस्टवर पोलिसांच्या मदतीला होमगार्ड, शिक्षक याचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. येणार्या जाणार्यांची माहिती घेतली जात आहे.कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पाटोदा तालुक्यातील अंमळनेर पोलिसांच्या मदतीसाठी होमगार्ड देण्यात आलेले असल्यामुळे अंमळनेर पोलिसांचा यामुळे तरी थोड्या फार प्रमाणात कामाचा भार कमी होणार आहे. या चेकपोस्टवर अंमळनेर पोलीस ठाण्या अंतर्गत काम करत असलेलं होमगार्ड विठ्ठल म्हस्के, शिक्षक डी.एम.नवाळे जवाहार विद्यालय निर्गुडी, एस.जी.सिरसाट जिल्हा परिषद शाळा शिक्षक, पोलीस, होमगार्ड चोख बंदोबस्त करत आहेत.
Leave a comment