वाटप करण्याबाबत बँकांना आदेश द्या
खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या जिल्हाधिकार्यांना सूचना
परळी । वार्ताहर
पीक कर्ज घेण्यासाठी शेतकर्यांना अडचणी येत आहेत. बँकांनी थकबाकीदार शेतकर्यांच्या याद्या लावाव्यात आणि उर्वरित सर्व शेतकर्यांना कर्जासाठी पात्र गृहीत धरून पुढील कारवाई करण्याबाबत सर्व बँकांना आदेश द्यावेत अशा सूचना खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी शनिवारी (दि.30) जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिल्या आहेत.
सध्या पेरणीचे दिवस आहेत. बळीराजा पेरणीसाठी सरसावला आहे पण कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्यांना पेरणीसाठी पीक कर्जाची आवश्यकता आहे. मात्र यासाठी बँका बेबाकी प्रमाणपत्र मागत आहेत. त्यामुळे शेतकर्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्यांना अडचणी येत आहेत. शेतकर्यांना सहजरीत्या कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी सर्व बँकांनी थकबाकीदारांची यादी लावावी आणि उर्वरित सर्व शेतकरी कर्जासाठी पात्र गृहीत धरून पुढील कारवाई करण्यासाठी बँकांना आदेश द्यावेत अशा सूचना खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिल्या आहेत.
Leave a comment