गेवराई । वार्ताहर
सध्या सर्वच बँका शेतकर्यांकडून पीककर्ज मागणीचे अर्ज घेत आहेत परंतु त्यासोबत फेरफार मागत आहेत परंतु फेरफार फक्त तहसील कार्यालयात असल्याने संपूर्ण तालुकायतील शेतकरी फेरफारसाठी तहसील कार्यालयात येत आहेत. त्यामुळे कोरोना सारख्या महामारीत प्रचंड गर्दी होत आहे. सोशल डिस्टन्सची ऐसी की तैसी होत आहे. तेव्हा बॅकांनी जुन्या खातेदारांकडुन फेरफार नकलीची मागणी करु नये अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
बँकेत येणारा ग्राहक हा बहुतांश वेळा जुना खातेदार असतो त्याचे सर्व कागदपत्रे.दस्तावेज शाखेमध्ये उपलब्ध असतात. त्याउपर एखाद्या खातेदारांच्या अद्यावत नावबाबत खाञी करण्यासाठी ई महाभुमी संकेतस्थळ उपलब्ध आहे. तसेच सातबाराचे अद्ययावत ऍप्स देखील उपलब्ध आहेत ज्यावरुन आपण खातेदाराच्या नावाबाबत खाञी करू शकतात त्यामुळे जुन्या खातेदाराकडुन फेरफार नक्कल मागणी करण्याची आवश्यकता नाही तशी मागणी देखील करु नये. तसेच त्या खातेदाराच्या माहीतीची जास्तीची अवश्कता पडल्यास बॅकांनी तहसीलकडुन फेरफार मागुन घ्यावेत अशी मागणी राजेंद्र मोटे यांनी निवासी जिल्हाअधिकारी यांना ई-मेलद्वारे केली आहे.
Leave a comment