आष्टी । वार्ताहर
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ आष्टी यांच्या वतीने शनिवार दिनांक 30 मे रोजी आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आ. बाळासाहेब आजबे, विधानपरिषद सदस्य आ.सुरेश धस यांना शिक्षकांच्या विविध मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.
या निवेदनामध्ये 29 मे 2020 च्या शासन निर्णयात दुरुस्ती करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचार्यांना या निर्णयाचा लाभ देणेबाबत, तसेच आपत्ती व्यवस्थापनांतर्गत कोरोना कोविड-19मध्ये कार्य करणार्या शिक्षक कर्मचार्यांना विमा संरक्षण देणे, र्लेींळव-19 संदर्भात कर्मचार्यांना प्रशिक्षण देऊन जुलैनंतर शाळा सुरू करणे बाबत, तसेच शिल्लक असलेल्या अर्जित रजेचे रजा रोखीकरण करून याचा लाभ स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचार्यांना मिळावा, भविष्य निर्वाह निधी अंतर्गत वित्त वितरण प्रणाली कार्यान्वित करून कर्मचार्यांना जीपीएफ परतावा त्वरित मिळावा, आपत्ती व्यवस्थापनात सूचित केलेल्या कर्तव्य कालावधी हा विशेष रजा कालावधी समजण्यात यावा इत्यादी मागण्यांचा समावेश होता यावेळी या मागण्यांचे निवेदन कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे शिक्षक नेते बा.म.पवार, शिक्षक नेते संतोष दानी, शिक्षक नेते उमेश झांबरे, शिक्षक नेते अशोक लटपटे, शिक्षक नेते अशोक धोंडे, दिव्यांग संघटनेचे नेते राजेंद्र लाड इत्यादींच्या या निवेदनावर स्वाक्षर्या असून या निवेदनाची दखल घेऊन लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अखत्यारीतील असून हा प्रश्न त्यांच्या वतीने सोडविण्याचे आश्वासन दिले. दरम्यान कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्यावतीने निवेदन स्वीकारताना आ.आजबे म्हणाले की आपत्ती व्यवस्थापनामध्ये निर्णय घेण्याचे सर्वाधिकार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळ असून या सर्व प्रश्नांचा पाठपुरावा करू असे सांगितले तर आ.धस यांनी शिक्षक विरोधी घेतलेल्या अनेक निर्णयाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली.
Leave a comment