बीड । वार्ताहर
जिल्ह्यात शनिवारी (दि.30) आणखी एका व्यक्तीचा स्वॅब अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तो मुंबई येथून डोमरी (ता.पाटोदा) येथे परतलेला आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
शनिवारी सकाळी जिल्ह्यातून एकुण 38 जणांचे स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले होते. यामध्ये जिल्हा रुग्णालयातून 33 तर परळीतून 5 जणांच्या स्वॅबचा समावेश होता. त्यातील 37 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून डोमरी येथील एका 38 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
Leave a comment