बीड । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर उत्पन्न वाढीसाठी प्रवाशी वाहतुकीप्रमाणेच आता राज्य परिवहन महामंडळाने माल वाहतुक सुरु करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी बीड विभागामार्फत विविध कंपन्या,व्यापारी, आस्थापनांशी संपर्क साधण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
बीड विभागात माल वाहतूक करण्यासाठी स्वंतत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. रा.प.महामंडळाने विभागात उपलब्ध एसटीच्या बंद बॉडीच्या वाहनातून माल वाहतुक करण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाच्या स्थितीत मालाची सुरक्षित पध्दतीने तसेच अत्यंत माफक दरात वाहतूक होणार असल्याने अधिकाधिक व्यापारी,कंपन्याच्या आस्थापनांनी,शेतकरी इ.माल वाहतुकीसाठी नियंत्रण कक्षास तसेच संबंधीत आगार प्रमुख यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन विभाग नियंत्रक कालिदास लांडगे यांनी केले आहे.
हे ही वाचा...
-बीड विभागात सध्या स्थितीत बंद बॉडीच्या एस.टी. ट्रक उपलब्ध आहेत.
-सुरक्षितपणे माल वाहतुक आणि तेहि माफक दरात असून तात्काळ सुविधा उपलब्ध होणार असल्याचे महामंडळाने म्हटले आहे.
-मालाचे वितरण वेळेवर होईल. शिवाय सात दिवस चौवीस तास सेवा सुरु ठेवली जाणार आहे.
बीड विभाग नियंत्रण कक्ष सेवेसाठी संपर्क
विभाग नियंत्रक कालीदास लांडगे-02442-222505/ 9422657593
विभागीय वाहतुक अधिकारी हर्षद बन्सोडे 02442-222582/9422655353
विभागीय भांडार अधिकारी संकेत राजहंस-02442-222596/8830820927
Leave a comment