गेवराई खून प्रकरणात मुलाची बापाविरूध्द अनोखी तक्रार

गेवराई । वार्ताहर

शहरातील शिक्षक कॉलनीत पतीनेच वृध्द पत्नीचा खून केल्याची घटना गुरूवारी दुपारी 2.30 च्या सुमारास घडली होती. दरम्या या प्रकरणात मयत महिलेच्या मुलाने आरोपी बापाविरूध्द तक्रार दिली असून घरात चोर आल्याचा भास झाल्याने त्या भासाच्या भरात पत्नीच्या डोक्यात काठी मारून तिला जिवे मारले असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनीही या तक्रारीवरून आरोपी बापाविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

गंधारबाई बप्पासाहेब घुले (60, रा.शिक्षक कॉलनी, गेवराई) असे मृत महिलेचे नाव आहे. गुरूवारी दुपारी 2.30 ते 3 वाजण्याच्या सुमारास आरोपी बप्पासाहेब भोनिराम घुले (65) याने पत्नी गंधारबाईच्या डोक्यात काठी मारून तिचा खून केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. घुले कुटूंब मुळचे जालना जिल्ह्यातील पाडूळी बुद्रूक येथील रहिवासी असून गेल्या काही वर्षांपासून ते गेवराईत वास्तव्यास आहेत. पोलिसांनी घटनेनंतर बप्पासाहेब घुलेला ताब्यात घेतले होते. दरम्यान मयत महिलेचा मुलगा अशोक घुले याने गेवराई ठाण्यात तक्रार दिली असून वृध्द वडिलांनी घरात चोर आल्याचा भास झाल्याने पत्नीच्या डोक्यात काठी मारून तिचा खून केला अशी तक्रार दिली आहे. उपनिरीक्षक मनिषा जोगदंड या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.