गेवराई । वार्ताहर
तहसिलदार धोडीबा गायकवाड यांना जिल्हाधिकारी यांनी सक्तीच्या रजेवर पाठवले असल्याने या कार्यालयाची अवस्था, असून अडचण नसून खोळंबा झाली होती त्यामुळे ग्रामीण भागातून येणार्या नागरिकांना त्रास होऊ लागल्याने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी वाळु माफियांचे कर्दनकाळ ठरलेले नायब तहसिलदार प्रशांत जाधवर यांना गेवराई तहसिलदार पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. येणार्या काही दिवसात बेशित झालेल्या तहसिल कार्यालयात अधिकारी कर्मचार्यांवर वचक ठेवणारा प्रमुख तहसिल कार्यालयाला मिळाल्याने अखेर ग्रामीण भागातील जनतेच्या अडचणी काही दिवसांत सुटतील व मरगळ आलेल्या कार्यालयाचा कारभार ही पुर्व पदावर येईल अशी आशा निर्माण झाली आहे.
Leave a comment