चौघाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

केज । वार्ताहर

केज तालुक्यातील टाकळी येथे उसन्या पैशाच्या कारणावरून कुर्‍हाडीने मारहाण केल्या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

दि.22 मे रोजी सायंकाळी 6 ते 6:10 वा.च्या सुमारास कबीर बुवांचे शेत नावाच्या शेता जवळील पाण्याच्या टाकी जवळ आदित्य शिवाजी बारगजे (29)व त्याचा मित्र हे मोटार सायकलवरुन टाकळी येथील घरी जात असताना विनायक व्यंकट बारगजे, भिवाजी व्यंकट बारगजे, गवळण व्यंकट बारगजे (रा.टाकळी) व पिनू बंडू चाटे (रा. तांबवा) या चौघांनी त्याला अडवून उसन्या पैशाच्या कारणा वरून मारहाण केली. भिवाजी व्यंकट बारगजे यांनी आदित्य यास कुर्‍हाडीने मारहाण करून जखमी केले. तर व्यंकट याने लोखंडी गजाने मारहाण केली. तसेच भिवाजी आणि गवळण यांनी दगडाने मारून जखमी केले. या प्रकरणी फिर्यादी आदित्य बारगजे यांच्या फिर्यादी नुसार दि.29 मे रोजी केज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करीत आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.