चौसाळा । वार्ताहर
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या सकल्पनेतून चौसाळा जि.प. सर्कल मधील पिंपळगांव तेलप वस्ती ते मानेवाडी या साडेचार कि.मी.लांबीच्या हॉटमिस्क डांबरी रस्त्याच्या 2 कोटीच्या कामाचा शुभारंभ दि.27 मे रोजी जि.प. सदस्य अशोक लोढा यांच्या हस्ते करण्यात आला.
सदरच्या रस्त्यामुळे वाढवणा पिपळंगाव, तेलपवस्ती या भागातील जनतेस उस्मानाबाद जिल्ह्यातील पारगाव व राष्ट्रीय महामार्गात जाण्यासाठी अतिशय जवळचा रस्ता झाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदी वातावरण आहे. माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या दुरदृष्टीमुळे बीड जिल्ह्यातच नव्हे तर सम्पुर्ण ग्रामीण भागामध्ये दळवणळाची व्यवस्था हा ग्राम विकासाचा केंद्रबिंदू मानून मुख्यमंत्री ग्रामसडक याजने मधून दर्जेदार रस्त्याची बांधणी केली. पंकजा मुंडे यांनी जवळपास राज्यामध्ये 30,000 कि.मी. डांबरी हॉट मिक्स रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळवून दिलेली आहे. त्या मुळेच बीड जिल्ह्यातील अनेक गावांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. यावेळी पिपळगांव घाट येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रा.प. सदस्य संतोष तेलप, अर्जून तेलप, रमेश माने, संतोष नाईकवाडे, पत्रकार अमोल तांदळे, बिबीशन मुळे, तेलप, बाळासाहेब तेलप, विजयकुमार तेलप, मझुकर नाईकवाडे, सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
Leave a comment