माजलगांव । वार्ताहर
माजलगांव येथील सद्गुरू श्री मिस्कीनस्वामी मठ संस्थान ने समाजिक बांधिलकी जोपासत कारोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारला संस्थेच्या वतीने मदतनिधि पाठविला आहे. राष्ट्रीय स्तरावर मा. पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी एक लाख रूपये अणि महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री यांच्या सहाय्यता कोेषात २५ हजार रूपये असे एक लाख पंचवीस हजार रूपयांचे दोन धनादेश येथील श्री सद्गुरू मिस्कीनस्वामी मठाचे मठाधीपती आणि संस्थानचे अध्यक्ष श्रीगुरू तपोरत्नं प्रभूपंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपल्या भक्तगणांसोबत माजलगांव तहसिल कार्यालयात जाऊन उपविभागीय अधिकारी श्रीमती शोभा ठाकुर यांचेकडे सुपूर्त केले.
मठाधिपती श्रीगुरू महाराजांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपविभागीय अधिकारी श्रीमती शोभा ठाकुर यांनी स्वत: आपल्या दालना बाहेर येऊन सदराल धनादेश स्वीकारले. यावेळी महास्वामींजी सोबत वीरशैव समाजाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते उत्तमअप्पा खुर्पे, बबनअप्पा खुर्पे, विलासअप्पा लांडगे, ऍड.मन्मथअप्पा लांडगे आदींची उपस्थिती होती.
Leave a comment