रायपूर : छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे शुक्रवारी हृदयविकाराचे दोन झटके आल्यानंतर रायपूर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते.
त्याचे निधन झाल्याची माहिती त्याचे सूपूत्र अमित जोगी यांनी शुक्रवारी दिली. अजित जोगी हे राष्ट्रीय काँग्रेसचे मोठ्या कालावधीसाठी सदस्य होते. त्यानंतर त्यांनी जनता काँग्रेस छत्तीसगडची स्थापना केली.
शनिवारी होणार अंत्यसंस्कार
अजित जोगी यांचे पुत्र अमित जोगी यांनी ट्विटरवर अजित जोगी याच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. अजित जोगी याच्या पार्थिवावर उद्या शनिवारी त्याचे जन्म ठिकाण गोरैला येते अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती, अमित जोगी यांनी दिली आहे.
Leave a comment