दोन्ही बाळांची प्रकृती ठिक आहे, मात्र जन्मानंतर काही तासातच या......

अहमदनगर । वार्ताहर

जुळ्या मुलांना जन्म देणार्‍या कोरोनाबाधित महिलेचा शुक्रवारी सकाळी पावणे नऊ वाजता मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. या महिलेचे गुरुवारी प्रसूती झाली होती. तिने जुन्यांना जन्म दिला होता. त्यात एक मुलगा आणि एका मुलगी आहे. दोन्ही बाळांची प्रकृती ठीक आहे. मात्र, जन्मानंतर काही तासांतच या मुलांचं मातृछत्र हरपलं आहे.

सीझरियन प्रसूती झाल्यानंतर महिलेला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. कोरोनाबाधित असलेल्या या महिलेला न्यूमॅटिक लक्षणे होती. ही महिला मुंबईहून निंबलक येथे आली होती. त्यानंतर तपासणीत ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती.

लग्नानंतर तब्बल 10 वर्षांनी घरात हलला होता पाळणा

अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात गुरुवारी एका कोरोनाबाधित महिलेने दोन गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला होता. सिझेरियन पद्धतीने ही प्रसूती करण्यात डॉक्टरांना यश मिळालं होतं. विशेष म्हणजे, कोरोना उद्रेकाच्या परिस्थितीमध्ये योग्य पद्धतीने काळजी घेऊन प्रसूती केल्याने आई आणि दोन्ही शिशुंना कोणातीही धोका नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण, शुक्रवारी महिलेची प्रकृती अचानक खालावली आणि तिचा मृत्यू झाला.

कुटुंबात नवा पाहुणा येणार यामुळे संपूर्ण कुटुंब उत्साहात असतं आणि तेही तब्बल लग्न नंतर 10 वर्षांनी घरात पाळणा हलणार असेल तर आनंद काही वेगळाच असतो. मात्र, ही महिला उल्हासनगरहून निबळक येथे आली होती. ती 9 महिन्यांची गरोदर होती. तिला त्रास होऊ लागल्याने 24 तारखेला अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिची कोविड-19 चाचणी करण्यात आली. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं महिलेसह कुटुंबीयांच्या चिंतेत भर पडली होती. कुटुंबात कोणालाही कोरोनाचा संसर्ग नसताना या महिलेला लागण झाल्याने कुटुंबीय घाबरून गेलं होतं.

महिला कोरोना पॉझिटिव्ह, मूल होत नाही, म्हणून ती खइऋ पद्धतीने गरोदर राहिलेली. ते ही लग्नानंतर 10 वर्षांनी, अशा परिस्थितीत नेमकं काय करावं? असा प्रश्न डॉक्टरांना पडला होता. जिल्हा शल्य चिकित्सक मुरणबीकर यांनी त्यांच्या टीमसह नगर अग्रगण्य स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतिशास्त्रज्ञ डॉ.जोत्सना डोले यांची मदत घेतली. या महिलेची 28 मे रोजी सिझेरियन प्रसूती करण्यात आली. ही प्रसूती यशस्वी झाली असून या महिलेने एक मुलगा आणि मुलीला अशा जुळ्यांना जन्म दिला होता.

शासकीय रुग्णालयात कोविड-19 रूग्णालयात विशेष आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या महिलेवर आणि दोन्ही बाळांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. डॉ. मुरणबीकर आणि त्यांच्या टीमने ही प्रसूती यशस्वी केली आहे. आई आणि दोन्ही मुलांना अतिदक्षता विभागात ठेवलं होतं. मात्र, महिलेचा शुक्रवारी सकाळी पावणे नऊ वाजता मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.