नवी दिल्ली :

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी आधार-आधारित ई-केवायसी वापरुन त्वरित पॅनकार्ड वाटप करण्याची सुविधा सुरू केली. ही सुविधा आता सर्व स्थिर खाता क्रमांक (पॅन) अर्जदारांना उपलब्ध आहे ज्यांच्याकडे वैध आधार नंबर आहे आणि ज्यांचा यूआयडीएआय डेटाबेसमध्ये नोंदणीकृत मोबाइल नंबर आहे. रिअल टाइम तत्त्वावर जारी करण्यात आलेल्या सुविधा कागदविरहित आहे आणि प्राप्तिकर विभागाने अर्जदारांना विना इलेक्ट्रॉनिक पॅन (ई-पॅन) विनामूल्य देत आहे. इन्स्टंट पॅन सुविधा आज औपचारिकपणे सुरू करण्यात आली, परंतु चाचणी आधारावर त्याचे 'बीटा व्हर्जन' आयटी विभागाच्या ई-फाईलिंग वेबसाइटवर फेब्रुवारीपासून उपलब्ध आहे.

विभागाने म्हटलं आहे की फेब्रुवारीपासून करदात्यांना ६.७ लाखाहून अधिक इन्स्टंट पॅन कार्डचं वाटप करण्यात आलं आहे.इन्स्टंट पॅनकार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. प्राप्तिकर विभागाच्या ई-फाइलिंग वेबसाइटवर जा, आपला आधार नंबर सामायिक करा आणि आधार नोंदणीकृत मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी सबमिट करा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, १५ अंकी पावती संख्या तयार केली जाईल. वाटप झाल्यानंतर पोर्टलवरून ई-पॅन कार्ड डाऊनलोड करता येईल. आधार नोंदणीकृत असल्यास, ई-पॅन अर्जदाराच्या ईमेल आयडीवर देखील पाठवलं जातं.

प्राप्तिकर विभागाने २५ मे रोजी सांगितलं की करदात्यांना आतापर्यंत एकूण ५०.५२ कोटी पॅनकार्ड वाटप करण्यात आले असून त्यापैकी ३२.१७ कोटींहून अधिक आधार प्रमाणित झाले आहेत. ३० जून २०२० पर्यंत आपलं पॅन कार्ड आधारशी जोडणं बंधनकारक आहे. प्राप्तिकर विभागाने सर्व प्राप्तिकर भरणाऱ्यांना पॅनच्या बदल्यात त्यांचा आधार क्रमांक वापरण्यास परवानगी दिली आहे.


 


 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.