नेकनुर । वार्ताहर

वादग्रस्त ठरलेल्या नेकनूरच्या देशी दारू दुकानातून गुरुवारी सकाळी एक स्कार्पिओ दारूचे बॉक्स घेऊन चालल्याचे नेकनुर पोलिसांच्या नजरेस पडले. पाठलाग केल्यानंतर ही सावज निसटल्याचे सांगितले जात असले तरी या पाठशिवणीच्या खेळात काही तरी दडले असल्याचे बोलले जात आहे.

दारू विक्रीसाठी अधिकृत परवानगी भेटताच त्रासदायक ठरलेल्या नेकनुरच्या देशी दारू विक्री केंद्राभोवती गर्दी निर्माण झाली यातच इतर ठिकाणी अनाधिकृत पणे दारूची  विक्री करण्यासाठी माल नेणारे वाहन दाखल झाले. सदरील वाहन मोठ्या प्रमाणात बॉक्स घेऊन निघताच पोलिसांनी पाठलाग सुरू केला मात्र हाती काही लागले नसल्याचे सांगितले जात आहे. सदरील स्कार्पिओ घाटावरील एका बड्या व्यवसायकाची असल्याचे बोलले जात आहे. चौदसवाडी रस्त्यावर या पाठशिवणीचा खेळ थांबला मात्र यातून काहीच पुढे न आल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.