वडवणी । वार्ताहार
बीड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेला रूग्न पॉझीटीव्ह निघाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.या रुग्णालयात देवडी येथील उपचार घेत असलेला रूग्न व त्याचे नातेवाईक संपर्कात आल्याने वडवणी तालुक्यातील देवडी गावात आठ दिवसासाठी संपूर्णपणे संचारबंदी लागू केली आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून वडवणी तालुक्यातील देवडी हे गाव 8 दिवसासाठी संपूर्णपणे सील करण्यात आले आहे. गुरुवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून वडवणी पोलीस स्टेशनचे एपीआय महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा फौजफाट्यासह पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आरोग्य विभाग व तहसीदार खिल्लारे, नायब तहसीलदार सांगळे, ग्रामसेवक नवनाथ राठोड ,तलाठी चव्हाण साहेब,सरपंच उपसरपंच यांनी शुक्रवार रोजी दिवसभर देवडी येथील नागरिकांना जाहीर आवाहन करत विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत होते.
Leave a comment