वाचवण्यास गेलेल्या पतीचाही अंत
गेवराई तालुक्यातील चव्हाणवाडी तांड्याची घटना
गेवराई । वार्ताहर
रागाच्या भरात पत्नीने विहिरीत उडी मारल्याने तिला वाचविण्यासाठी तिच्या नवर्याने उडी मारली.माञ दोघांचाही यामध्ये करून अंत झाला.ही घटना गेवराई तालुक्यातील चव्हाणवाडी तांडा येथे गुरुवारी (दि.28) सायंकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
सुनील बाबासाहेब चव्हाण (21) व मनिषा सुनिल चव्हाण (20) रा.चव्हाणवाडी तांडा ता गेवराई जि.बीड असे विहीरीत मृतदेह आढळलेल्या नवविवाहित दाम्पत्याची नावे आहेत. या दोघांचा विवाह एका वर्षापूर्वी झाला होता असे सांगितले जाते.दरम्यान गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास या दोन्ही नवविवाहित दाम्पत्याचे मृतदेह गावा जवळील एका शेतकर्याच्या विहीरीत तरंगताना ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.यानंतर या घटनेची माहिती चकलांबा पोलिसांना कळताच सहायक पोलिस निरीक्षक विजय देशमुख, पोउपनि.दिगांबर पवार, बप्पासाहेब झिंझुर्डे यांनी कर्मचार्यांसह घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. यानंतर दोघांचेही मृतदेह ग्रामस्थांच्या सहायाने बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी उमापुर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते. सदरील नवविवाहित दाम्पत्यांनी आत्महत्या केली की त्यांची कोणी हत्या केली? हे अद्याप स्पष्ट नाही. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Leave a comment