बीड । वार्ताहर
जिल्हा रुग्णालयातून बुधवारी ईटकूर व हिवर्याच्या कोरोनामुक्त रुग्णाला सुटी दिल्यानंतर आता आज शुक्रवारी माजलगाव तालुक्यातील कवडगाव थडी येथील दोन रुग्णांना सुटी दिली जाणार आहे. त्यामुळे बाधित रुग्णांची भर पडत असल्याचे चिंतेचे वातावरण असले तरी, यातही रुग्ण बरे होत असल्याने हा दिलासा मानला जात आहे.
माजलगाव तालुक्यातील कवडगाव थडी येथील हे दोन्ही रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. 65 आणि 18 अशी दोघांची वय आहेत. यात एका मुलीचा समावेश आहे.मुंबईहून ते कवडगाव थडी येथे आले होते. 18 मे रोजी त्यांचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर दहा दिवसांपासून जिल्हा रुग्णालयातील कोव्हिड वॉर्डमध्ये उपचार सुरु होते. त्यांना कोरोनाची लक्षणे नव्हती तरी ते पॉझिटिव्ह आले होते. दरम्यान,आयसीएमआरच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार लक्षणे नसलेल्या रुग्णांना दहा दिवसांत सुटी दिली जात आहे. यानुसार आता या रुग्णांना शुक्रवारी सुटी दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.
Leave a comment