दूध भाजीपाला विक्रेत्यांना दिली परवानगी
बीड । वार्ताहर
पाटोदा तालुक्यातील कारेगाव येथे कोरोना बाधित रुग्ण निघाल्यानंतर बीडमध्ये संपर्क आल्याने जिल्हाधिकारी रेखावार यांनी बीड शहरासह तीन तालुक्यातील अठरा गावामध्ये संचारबंदी घोषित केली ,मात्र काही लोकांनी कोर्टात जाण्याचा इशारा देताच जिल्हाधिकारी रेखावार यांनी संचारबंदीचा निर्णय फिरवला आणि भाजीपाला ,फळे ,विक्रते,दूध विक्रते याना पुन्हा विक्री अन पुरवठा करण्यासाठी परवानगी दिली आहे. यापूर्वीही संचारबंदी शिथील कालावधी वाढवण्यासंदर्भात काही लोकांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर जिल्हाधिकार्यांनी सात ते साडेनऊ ऐवजी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत वेळ वाढवून दिला होता.
कारेगाव बाधित रुग्णाच्या पार्श्वभूमीवर शहरासह आता गावांमध्ये आता अचानकपणे संचारबंदीचा निर्णय घेतला गेला. बीड शहरामध्ये पोलीस प्रशासनाकडून रात्री माईकवरुन उद्घोषणा केली गेली आणि रात्री उशिरा जिल्हाधिकार्यांनी संचारबंदीचा आदेश काढला. मात्र काल दुपारी एका माजी आमदाराने न्यायालयात जाण्याचा इशारा देताच जिल्हाधिकार्यांनी पुन्हा आपलाच निर्णय 24 तासाच फिरवला. हा निर्णय फिरवताना त्यांनी प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रकाशित झाल्यानंतरदेखील आदेश काढला नव्हता. त्यामुळे लोकांमध्ये, सोशल मीडियावर, वर्तमानपत्राच्या पोस्ट केल्या जाणार्या बातम्यांवरही विश्वास ठेवावा की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. काही मोजक्या लोकांच्या इशार्यावर जिल्हा प्रशासन चालत असून सर्वसामान्य जनतेमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहेत. एकतर निर्णय घ्यायलाच नको होता, निर्णय जो घेतला तो अचानक घेतला गेला आणि आता पुन्हा काही पुढार्यांनी विरोध केल्याने तो पुन्हा बदलला आहे. प्रशासन नेमके कोणासाठी? असा प्रश्न यामुळे जनतेला पडला आहे.
Leave a comment