बदनापूर । वार्ताहर
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने मार्ङ्गत बचत गटाच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दित 200 उंच झाडे लावण्यासाठी आज पंचायत समिती सभागृह बदनापूर येथे बैठक संपन्न झाली,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील बचत गटातील महिलांच्या हाताला काम भेटावे म्हणून महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतच्या हद्दित 200 उंचीची रोपांची लागवड करुन त्यांची जोपासना तीन वर्षे करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतच्या माध्यमातून बचत गटांना 3 लाख 12 हजार 819 रुपयाचा निधी मिळणार आहे पण तो प्रत्येक वर्षी टप्याटप्याने प्रत्येक झाड जगवण्यासाठी देण्यात येणार आहे .
प्रत्येक वर्षी 521 रुपये एका झाडा प्रमाणे तीन वर्षासाठी एका झाडास 1564 रुपये प्रमाणे 200 झाडांची देखभाल करण्यासाठी जवळजवळ 3लाख 12 हजार 819 रुपयाचा निधी मिळणार असून हे झाडे गावठाण , शाळेचे प्रागंण , मंदिर परिसर , बाजार परिसर , स्मशानभुमि परिसर शासकीय / निमशासकीय कार्यालयाजवळ सामुहीक व शैक्षणिक संस्था यांच्या जमिनीवर व ग्रामपंचायतच्या हद्दित येत इतर उपलब्ध जागेत जास्तीत जास्त 200 उंच रोपांची लागवड करण्यासाठी ही बैठक जालना जिल्हापरीषद प्रतिनिधी शैलेश चौधरी , गटविकासअधिकारी हारकळ , सह्याक गटविकासअधिकारी भुतेकर , पंचायत समिती बचत गट प्रमुख एम एन .म्हस्के , प.स.कृषी अधिकारी राजेन्द्र तांगडे , नम्रता गोसावी यांची उपस्थिती होती . विशेष म्हणजे लाकडाऊनच्या काळात सर्वत्र सामाजिक अंतर ठेवून कामे करण्याच्या सक्त सुचना असताना सुध्दा बदनापूर तालुक्यातील सर्व पंचायत समिती अंतर्गत येणार्या बचत गटातील शंभर ते सव्वाशे महीला बैठकीस बोलावून जिल्हाअधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवविल्याचे चित्र आज बदनापूर पंचायत समितीच्या बैठक हाल मध्ये बघावयास मिळाले . या मुळे कोरोनाचा प्रादृर्भाव वाढणार की घटणार ? एकत्र बैठक घेण्याऐवजी सर्व ग्रामपंचायत स्तरावर जावून गावातील बचत गटाच्या स्वतंत्र बैठका घेतल्या असत्या तर ग्रामीण भागातुन येणार्या बचत गटातील महीलांना उन्हाचा त्रास झाला नसता त्याच बरोबर त्यांना आर्थिक भुर्दड बसला नसता व सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाकडाऊन मध्ये सामाजिक अंतर पाळले गेले असते . हे महत्त्वाचे . पंरतु साहेबाच्या आले मना तेथे कुणाचे चालेना ! कोरोनाच्या प्रादृर्भाव रोखण्यासाठी सर्व शासकीय निमशासकीय बैठकीवर प्रतिबंध असताना अशी बैठक कुणाच्या आदेशावरुन घेण्यात आली . हे मात्र गौडबंगालच म्हणावे लागेल.
Leave a comment