पाच आयएएस अधिकार्यांना कोरोनाची लागण
मुंबई । वार्ताहर
राज्यातील काही मंत्र्यांना, पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं ताजं असताना आता प्रशासकीय अधिकार्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. राज्यातील सुमारे 5 आयएएस, आयपीएस अधिकार्यांना कोरोनाची लागण झाली, या अधिकार्यांवर सध्या विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे. कोरोना संकट काळात पोलीस, डॉक्टर्स याप्रमाणे प्रशासकीय अधिकारीही जीव धोक्यात घालून काम करत आहे.
अनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटरला प्रशासकीय अधिकारी भेट देत असतात, मंत्र्यांसोबत त्यांचे पाहणी दौरे, बैठका सुरु असतात, त्यामुळे त्यांनाही कोरोना संक्रमणाचा धोका अधिक असतो. कोरोनाची लागण झालेल्या या 5 अधिकार्यांपैकी 2 दाम्पत्य आहेत. एक निवृत्त आयएएस अधिकारी ज्याला प्रतिनियुक्ती देण्यात आली होती, त्याशिवाय एक आयएएस अधिकारी आणि त्याची पत्नी, एक आएएस महिला अधिकारी आणि त्यांचे आयपीएस पती, यांना कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे मुंबईतल्या विविध खाजगी इस्पितळांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र यामुळे अधिकारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरलं आहे.
Leave a comment