कोरोनाने घेतला 66 वा बळी
औरंगाबाद । वार्ताहर
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमध्ये कोरोना रूग्णांचे मृत्युचे प्रमाण वाढतच असून केवळ पंधरा दिवसांमध्ये एकूण लागण झालेल्या रूग्णांपैैकी 64 टक्के रूग्णांचा मृत्यु झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत देशाचा मृत्यु दर केवळ 2.86 टक्के आहे, तर राज्याचा मृत्युदर 3.21 आहे. त्यानंतर पुण्याचा मृत्युदर 4.56 तर औरंगाबादचा मृत्युदर 4.44 टक्के आहे. पुण्यामध्ये मृत्युचे प्रमाण गेल्या आठवड्याभरात कमी झाल्याने औरंगाबादचाच मृत्युदर सर्वात जास्त आहे, दरम्यान शहरात खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सादातनगर येथील 72 वर्षीय कोरोनाबाधीत वृद्धाचा बुधवारी रात्री मृत्यूझाल्याचे समोर आले आहे. हा औरंगाबादेतील कोरोनाचा 66 वा बळी ठरला आहे.
एक मे ते 21 मे यादरम्यान औरंगाबादेत कोरोनाचा उद्रेक होता. या काळात एक हजार सात रुग्ण वाढले; तर 52 रुग्णांचा मृत्यू झाला. अर्थात एक हजार सात रुग्णांमागे 5.16 एवढा मृत्युदर होता. विशेषतः एकूण रुग्णांच्या मृत्यूपैकी 15 ते 21 मे दरम्यान 38.98 मृत्यू व 21 ते 26 मे या सहा दिवसांत 25.42 एवढे मृत्यूचे प्रमाण आहे. एकूण कोरोनाच्या साथकाळापैकी तब्बल 64.40 टक्के मृत्यू केवळ दहाव्या व अकराव्या आठवड्यातील आहेत ही गंभीर बाब आहे.
Leave a comment